मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त विभागीय माहिती कार्यालयात ध्वजवंदन
औरंगाबाद/प्रतिनिधी - मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या येथील विभागीय माहिती कार्यालयात मराठवाडा विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक संचालक प्रमोद धोंगडे, माहिती अधिकारी मीरा ढास, माहिती सहाय्य्क संजीवनी जाधव, श्याम टरके, रेखा पालवे आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.