आईरे गईरे नथू खैरे हे औरंगाबादचं नाव बदलू शकत नाही

औरंगाबाद / प्रतिनिधी - संभाजीनगर विरोधी कृती समितीच्या वतीने आज औरंगाबाद येथे संभाजीनगर नामकरणाच्या विरोधामध्ये मूक मोर्चा काढण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर ठेवण्यात आले याचा विरोध करत आज संभाजीनगर विरोधी कृती समितीच्या वतीने भडकल गेट ते हमखास मैदान मूक मोर्चा काढण्यात आला होता.

या मूक मोर्चामध्ये आम्ही औरंगाबादकर आय लव औरंगाबाद अशी नाम फलक घेऊन हा मूक मोर्चा हमखास मैदान या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्या भाषणानंतर संपन्न झाला. जलील यांनी त्यांच्या भाषणात औरंगाबादचे नाव आम्ही बदलू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. आमचा पक्ष कोणाच्या मर्जीने चालत नाही कोणी म्हणलं तर आम्ही उठेल कोणी बस म्हणलं तर आम्ही बसेल तसा आमचा पक्ष नाही आहे. आम्ही जी भूमिका घेतली आहे ती भूमिका आम्ही आखरीपर्यंत पुढे नेऊ.  नामकरण औरंगाबादकरांना विश्वासात न घेता तुम्ही औरंगाबादचे नाव कसे काय बदलू शकता असाही सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित नागरिकांना केला. औरंगाबाद वरती आमचे प्रेम आहे आणि पुढे देखील राहणार मुंबईमध्ये बसून औरंगाबादकरांचे नाव कोणीही बदलू शकत नाही या मूक मोर्चा मध्ये भाजप आणि शिवसेना वगळता सर्व पक्षाचे कार्यकर्ते सामील झाले होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा