Samsung चा 5G फोन लॉंच; मिळेल पावरफुल बॅटरी-कॅमेरा

Samsung चा 5G फोन लॉंच; मिळेल पावरफुल बॅटरी-कॅमेरा

Samsung ने त्यांचा Samsung Galaxy A23 5G हा लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. काही स्पेसिफिकेशन्स आणि इमेजेससह हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला Galaxy A23 5G मध्ये फुल-एचडी+ रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Android 12 वर आधारित One UI 4.1 वर चालतो. मात्र, सॅमसंगने प्रोसेसरबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. कंपनीने सरळ सांगितले की फोन ऑक्टा-कोर चिपने सुसज्ज आहे. याशिवाय, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v5.1 आणि ड्युअल-बँड वाय-फाय सपोर्ट दिला आहे.


Samsung Galaxy A23 5G
ची किंमत

सध्या कंपनीने Samsung Galaxy A23 5G ची किंमत आणि उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. त्याची किंमत गेल्या वर्षी आलेल्या A22 5G च्या आसपास असू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खरं तर, Galaxy A22 5G भारतात गेल्या वर्षी जुलैमध्ये 6GB RAM + 128GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटसाठी 19,999 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. तर त्याच्या 8GB RAM + 128GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये होती. म्हणून आपण Samsung कडून नवीन Galaxy A23 5G ची किंमत समान ठेवण्याची अपेक्षा करू शकतो.

सॅमसंगने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, Galaxy A23 5G गुलाबी, निळा, पांढरा आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये दिसत आहे. कंपनीने अद्याप यापैकी कोणत्याही कलप ऑप्शन्ससाठी कोणतेही नाव जाहीर केलेले नाही. सॅमसंगने Galaxy A23 5G लाँच केलेल्या देशांची नावे देखील उघड केलेली नाहीत.

 

 

 

 

 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा