कृषी विज्ञान केंद्र येथे शेतकऱ्यांना बियाणी किट वाटप
औरंगाबाद/प्रतिनिधी - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने केंद्रीय कृषी मंत्रालय आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्र येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते वृक्षरोपण आणि शंभर शेतकरी कुटुंबांना मोफत बियाणे किटचे वाटप करण्यात आले.
केंद्र सरकारनेआंतरराष्ट्रीय पोषण तृणधान्य वर्ष 2023 उद्दिष्ट ठेवले असून ,यामधून नागरिकांना सकस आहार उपलब्ध करण्यावर भर देण्यात आलेला आहे. यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून पौष्टिक तृणधान्य अभियान राबविण्यात येत आहे. सध्या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांनी पिक रचनेत मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे. त्यामुळे बदललेल्या पीक रचनेचा विचार करता शेतकऱ्यांनी यापुढे बाजरी ,ज्वारी ,नाचणी पीक घेण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे . शरीरास असणारे पौष्टिक घटक तृण धान्यातून मिळते ज्वारी बाजरी मधून लोह प्रथिने मिळतात . त्यासाठी आगामी काळात शेतकर्यांनी ज्वारी बाजरी नाचणी पिक घेण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी पोषण तृणधान्य मिशन सुरू करण्यात आलेले आहे. यामध्ये शेतकरी कुटुंबांना तृणधान्य घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासंदर्भात उपाय योजना करण्यात येत आहेत.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक एस. बी.पवार, इफकोचे कुलकर्णी ,यासह कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी आणि शेतकरी महिला उपस्थित होते.यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षां च्या कालखंडामध्ये गोरगरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना जाहीर केल्या, त्याविषयी मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या धर्तीवर सरकार काम करीत आहेत असेही यावेळी सांगतले.