औरंगाबाद मधील भयंकर घटना मोबाईलसाठी केली आत्महत्या
औरंगाबाद /प्रतिनिधी - मोबाईलच्या अति वापरासाठी वडील रागवले म्हणून आरती सुनील सिदलंबे या 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची भयंकर घटना औरंगाबाद मध्ये घडली आहे
घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. शहरातील गारखेडा परिसरातील न्यू हनुमाननगरमध्ये ही घटना घडली आहे.
सध्या मोबाईलचा अतिवापर हा पालकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. अशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.मोबाईलचा अतिवापर होत असल्याचे वडिलांच्या लक्षात आल्याने वडिल ओरडल्याचा राग मनात धरत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली.
दरम्यान या घटनेने औरंगाबाद शहरात मोठी खळबळ माजली आहे. किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्याने मुलांना कोणत्या भाषेत समजवायचं हा प्रश्न पालकांसमोर पडला आहे. दरम्यान याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
गारखेड्यातील न्यू हनुमाननगरमध्ये कुटुंबासह राहणारी आरती पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. दरम्यान 18 डिसेंबरला सुनील सिदलंबे हे काम आटोपून घरी परतले. त्यावेळी त्यांना आरतीच्या हातात मोबाइल दिसला.
मोबाइलच्या अतिवापरामुळे आई-वडिलांनी आरतीला अनेकदा समजावून सांगितले होते. मात्र आरतीच्या अति मोबाईल वापरण्याची सवय काही कमी झाली नाही. त्यामुळे रविवारी आरतीच्या हातात मोबाइल पाहून वडील तिला पुन्हा रागावले आणि याचाच राग मनात धरत आरतीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.