शासकीय वाहन चालक संघटनेची दिनदर्शिका प्रकाशित
औरंगाबाद/प्रतिनिधी
शासकीय वाहन चालक संघटनेची दिनदर्शिका दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकाशित करण्यात आली. या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या हिरवळीवर उपायुक्त पराग सोमण, पांडुरंग कुलकर्णी, सुरेश बेदमुथा यांच्याहस्ते झाले. यावेळी नायब तहसीलदार घुसिंगे, संघटनेचे अध्यक्ष शेषराव पौळ, सचिव दिलीप बावस्कर, उपाध्यक्ष भारत धारकर, राधानगरी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष शेख इब्राहिम, कल्पना नेवे, डी.के राठोड, धर्मराज ढंगारे, नरहरी मुंढे, फुलचंद चव्हाण, श्री.माळकर आदींची यावेळी उपस्थिती होती.