पाकिस्तान मध्ये बॉम्ब स्फोट 36 लोकांचा मृत्यू
पाकिस्तान: पाकिस्तानमधील पेशावरमधील एका मशिदीत मोठा बॉम्बहल्ला झाला आहे. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 30 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 50 हून अधिक जखमी झाले असल्याची माहिती जिओ न्यूजनं दिली आहे.
एका मशिदीत आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात आतापर्यंत 36 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एका आत्मघातली बॉम्बरनं स्वत:ला गर्दीमध्ये स्फोटकांनी उडवून दिलं. या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरु झालं आहे.
जखमींची संख्या अधिक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप हा हल्ला कुणी घडवला याबाबत माहिती मिळालेली नाही.