शेकडो तरूण रोज ठरतायत सोरटचा शिकार
पैठण /प्रतिनिधी - पैठण तालुक्यातील नवगाव येथील बाजार तळ मैदानात रोज सोरट नावाचा जुगार खेळल्या जात असून शेकडो तरूण रोज या खेळाचा शिकार होत आहेत तर काही तरूण पैसे हरल्यास चुकीचा मार्ग निवडून गुन्हेगारीकडे वळतअसून पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.
कोरोना साथीच्या रोगाने गेल्या दोन वर्षापासून मजुराच्या हाताला काम नसल्याने मजूर हताश झाल्याचे चित्र पुर्ण देशाने बघितले व अनुभवले देखील. त्यातच मोलमजुरी करून जेमतेम पैसा कमवून प्रपंच चालवत असतांनाच थोडे पैसे लावून जास्त पैसे कमवण्याचे लालसेपोटी सोरट नावाच्या जुगारावर पैसे लावण्यासाठी तरूण वर्गासह मजुरही सरसावत असल्याचे चित्र नवगावात पहावयास मिळत आहे .लावलेला पैसा हा परत येईलच याची लांबपर्यंत शक्यता नसते परंतू लोभापायी पैसे लावून हरवून बसल्यावर हताश होवून गुन्हेगारीकडे तरूणांची आगेकुच होत आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून या बाबीकडे पोलिसांनी लवकरात लवकर लक्ष देऊन जुगार चालवणा-या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकातून होत आहे .