निरामय हॉस्पिटलवर गुन्हा दाखल

निरामय हॉस्पिटलवर गुन्हा दाखल

औरंगाबाद /प्रतिनिधी -  निरामय हॉस्पिटल मधील बायोमेडिकल वेस्ट सार्वजनिक वाहनातून कचरा घेऊन जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या घंटागाडीत टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी शालूताई भोकरे यांनी तक्रार दिली होती.  त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. प्रवीण जोशी यांच्या फिर्यादीवरून निरामय हाॅस्पिटलवर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
           वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील निरायम हॉस्पिटलचा वैद्यकीय घनकचरा घंटागाडीत भरून त्याची उघड्यावर विल्हेवाट लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हाेता. यासंदर्भात घाणेगावच्या शालूताई भोकरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली हाेती. तक्रारदार महिलेने हा व्हिडिओ दिल्याने संबंधित विभागाने व्हिडिओची दखल घेऊन डॉ. प्रवीण जोशी यांनी क्षेत्र अधिकारी आर. जी. औटी, दीपक बनसोड यांना १९ सप्टेंबर राेजी रांजणगावात जाऊन हॉस्पिटलची पाहणी करण्यास सांगितले. जैविक कचऱ्याची कशा पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, यासंबधी चाैकशी केली असता हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तरे व दस्तऐवज उपलब्ध न झाल्याचा अहवाल औटी व दीपक बनसोड यांनी वरिष्ठांकडे सादर केला होता. त्यानुसार हॉस्पिटलचे प्रभारी व कामावरील हजर अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपस पोलीस करत आहे. 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा