सिड़को हडको माहेश्वरी महिला मंडळाची अनोखी होळी साजरी

सिड़को हडको माहेश्वरी महिला मंडळाची अनोखी होळी साजरी

संभाजीनगर /प्रतिनिधी - सिडको हडको माहेश्वरी महिला मंडळाने पाण्याची बचत करत फुलांची होळी साजरी करून एक नवीन आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
एक पेक्षा एक उत्कृष्ट कार्यक्रमाच्या श्रृंखलेत सिडको हाडको माहेश्वरी महिला मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये आनखी भर पडली! राधा कृष्ण रासलीला , होळी चे भजन , फुलांची होळी, एकादशी चे 56 भोग, आणि या सोबतच होळी निमित्त "शेला पागोटे" चा अनोखा कार्यक्रम झाला.
भजनामध्ये प्रीती झंवर कृष्ण आणि मधु करवा राधा च्या वेशभूषेत अतिशय मोहक दिसत होते! राधा ढूंढ रही किसी ने मेरा श्याम देखा, मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो शृंगार नजर लग जाएगी , भर दे रे श्याम झोली भरदे, आज बिरज मे होली रे रसीया आनी"किती सांगू मी सांगू कुनाला " या भजन गीतांवर सख्यानीं राधा कृष्ण सोबत फेर धरुन भजना मध्ये रंग भरला! सगळे वातावरण गोकुल मय झाले होते! राधा कृष्ण सोबत जणू गोपीनीं च रास धरला आहे असे वाटत होते ! आपल्या संस्कृतीचे जतन करून आपले उत्सव तर साजरे करायचे पण पाण्याचा त्रास बघता सुखी होळी आणि फूल खेळून "जल है तो कल है " असा पाणी वाचवा हा संदेश ही दिला। 50 ते 60 महिलांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला होता. होळी निमित्त शेला पागोटे चा कार्यक्रम झाला ! सख्यांनी ठंडाइचा स्वाद घेउन कार्यक्रमा ची सांगता केली! प्रकल्प प्रमुख म्हणुन मंजू गिल्डा आणी वैशाली झंवर यांनी काम पाहीले !
कार्यक्रमाला अध्यक्ष प्रीती झंवर, सचिव अनीता सोनी, खजिंनदार मधु करवा, मंजू गिल्डा वैशाली झंवर पल्लवी लड़ा तृप्ति सोनी अनुराधा मुंद्डा, नेहा भंडारी,डॉ पद्मा तोष्णीवाल,श्रद्धा मनियार, प्रतिमा सोनी ,रमा नावंदर सह अनेक महिलांची उपस्थिती होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा