नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांच्या मागणीला यश
औरंगाबाद /प्रतिनिधी- नगरसेवक सिंध्दात शिरसाट यांनी गेल्या 3 वर्षांपूर्वी मनपाच्या बैठकीत अतिक्रमणमध्ये असलेला रेल्वे स्टेशन येथील पेट्रोल पंप काढण्यात यावा म्हणून मुद्दा उपस्थित केला होता. रेल्वे स्टेशन हा रस्ता नागरिकांचा दळणवळणाचा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते परंतु याठिकाणी असलेल्या अतिक्रमणातील पेट्रोल पंपामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन ट्राफिक जाम होत अपघातांचे प्रमाण देखील वाढले होते. त्यामुळे पेट्रोल पंप लवकरात लवकर हटविण्यात यावा अशी मागणी सिद्धांत शिरसाट यांनी केली होती व त्या मागणीला उशिरा का होईना यश आले.
नगरसेवक शिरसाट यांनी हे अतिक्रमण काढले नाहीतर राजीनामा देऊ आणि हा पेट्रोल पंप काढण्यासाठी त्यांनी पायातील चप्पल सोडून आंदोलन देखील केले होते तेव्हा देखील मनपाने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले होते.अतिक्रमित पेट्रोल पंप काढला तर हा रस्ता विस्तृत होईल जेणेकरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असलेली वाहतुकीची कोंडी दूर होईल व नागरिकांना देखील फायदा होईल. असे शिरसाट यांनी सांगितले.
परंतु आता उशिर का होईना मनपाला जाग आली आहे, त्यांनी तेव्हाच हा निर्णय घेतला असता तर आज त्याठिकाणी रस्ता तयार होऊन शहराच्या सौंदर्या मध्ये भर पडली असती. असो मनपाने केलेल्या कार्यवाही बद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि पुन्हा विनती करतो की लवकरच मनपाने आजूबाजूला असलेले अतिक्रमण देखील काढावे जेणेकरून संभाजीनगर शहरात पर्यटनसाठी येणाऱ्या पर्यटकांना व शहरातील नागरिकांना चांगले चित्र दिसेल. या शब्दात मनपाचे आभार व्यक्त केले.