जखमी अवस्थेत सापडला सुंदर मोर पहा व्हिडिओ

औरंगाबाद/ प्रतिनिधी -    चिकलठाणा परिसरात  आज सकाळी 8:30च्या सुमारास शेतकरी विनायक दहीहंडे यांच्या शेतातील शिंदीच्या झाडावर जखमी अवस्थेत मोर जातीचा पक्षी आढळून आला.
    दहीहंडे यांनी त्वरित सदर माहिती सर्प व प्राणी मित्र संघानंद शिंदे  यांना कळवली. शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी शेतात जाऊन गावातील इतर शेतकऱ्यांच्या मदतीने जखमी मोराला झाडावरून खाली काढाले आणि या घटनेची माहिती वनविभागाला सांगितली.

वनविभागाचे दादासाहेब तौर, वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग यांना त्याची माहिती दिली. काही वेळात वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल होताच मोरास सुखरूप त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

सध्या उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून पशु, पक्षी, प्राणी अन्न पाण्याच्या शोधात शहरालगत शेतात येत असल्याचे दिसते.काही दिवसांपूर्वी चिकलठाणा परिसरातील विहिरीत मृत अवस्थेत बिबटया आढळून आला होता.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा