बौद्ध समाजमंदिरासाठी जागा मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
औरंगाबाद/ प्रतिनिधी - मौजे कांचनवाडी ता. जि. औरंगाबाद येथील वार्ड क्र. १०६ येथील गायरान ग. नं. १९ मधील जागा बौद्ध समाजाच्या समाज बांधवांना देण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
यामध्ये कांचनवाडी येथे बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात राहत असून या समाजाला सामाजिक कार्यासाठी बौद्ध विहार नाही. शासनाच्या नियमानुसार गायरान शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक९(१) नुसार केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सार्वजनिक सुविधा व सार्वजनिक प्रयोजन यासाठी अन्य जमीन उपलब्ध नसल्यास याबाबत विचार करावा असे स्पष्टपणे म्हटले आहे. म्हणून बौद्ध समाजाला समाज मंदिरासाठी कुठे जमीन उपलब्ध नसल्याने नंबर 19 मधील तो बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ची जमीन बौद्ध समाजाच्या समाज मंदिरासाठी देण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष विनोद कोरके, रावसाहेब गायकवाड, किशोर जाधव, संतोष शेजवळ, राजेंद्र जावळे, रमेश आदमाने, संदीप साबळे, रतन पागोरे, राहुल गायकवाड, संजय साळवे, राहुल कीर्तिकर यांचा समावेश आहे.