विवेकानंद महाविद्यालयात महिला दिन संपन्न

विवेकानंद महाविद्यालयात महिला दिन संपन्न

औरंगाबाद / प्रतिनिधी - विवेकानंद महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातर्फे महिला दिनानिमित्त प्रा. माधवी पोफळे यांचे ऑनलाईन व्याख्यान  आयोजित करण्यात आले होते.
 व्याख्यानात महिला सशक्तीकरण या विषयावर बोलत असतांना त्या म्हणाल्या तंत्रज्ञानाच्या युगातही आरशाला दोन बाजू अजूनही आहेत. जुन्या परंपरेला कवटाळलेली स्त्री आणि दुसरीकडे घर संसार सांभाळुन प्रगति पथावर अग्रेसर झालेली स्त्री दिसुन येते तसेच त्या पुढे म्हणाल्या हुंड्यासाठी आजही स्त्रिला जाळले जाते हा अन्याय केव्हा कमी होईल सांगता येत नाही. पारंपारीक स्त्री चूल आणि मूल यातच गुरफटलेली होती आज ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. डॉक्टर, वकील, प्राध्यापिका, आर्मी, इंजीनियर , सरपंच अशा सर्व ठीकाणी स्त्री पुढे आहे.

   प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या संसारात समर्पीत होऊन पुरुषांच्या जीवनाची मधुरता वाढविते.

आणि शेवटी त्या म्हणाल्या ' 

कोमल है तू कमज़ोर नहीं तु,

शक्ति का नाम नारी हैै।

 जग को जीवन देनेवाली,

 मौत भी तुझसे हारी है।


 या प्रसंगी प्राचार्य डॉ. रामदास वनारे, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शेजुळ व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ऑनलाइन हजर होते.

   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रविंद्र शिंदे यांनी मांडले.

 या ऑनलाईन व्याख्यानानंतर प्राचार्य वनारे सरांच्या हस्ते सर्व महिला प्राध्यापिकांचा सत्कार करण्यांत आला.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा