वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात कंटेनर ने मागून दिली धडक
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. बसला कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
अपघात खोपोली जवळ झाल्याची महिती समोर आली आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत, त्यातील 4 जण गंभीर आहेत. जखमींना नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बस चालकाचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. अपघातस्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून मदतीसाठी आयआरबी, देवदूत , महामार्ग पोलिस , अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे.
अपघातातील 4 गंभीर जखमीना एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तर 6 जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार चालू आहेत. 10 ते 12 किरकोळ जखमींना घटना स्थळावर प्राथमिक उपचार केले जात आहेत. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असल्याने तीनही लेन वरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.