कन्नड येथे 25 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

कन्नड येथे 25 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

कन्नड/प्रतिनिधी - महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्ताने श्री. शिवेश्वर संस्थान वाकी ता. कन्नड येथे भेट दिली होती. यावेळी त्यांनी संस्थान परिसरातील विकास कामांसाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 25 लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली. होती. शुक्रवार ( दि.18 ) रोजी  राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या घोषणेची पूर्तता केली. मंदिर परिसरात ग्रामविकास विभाग अंतर्गत मंजूर 25 लाख रुपयांच्या सभागृह बांधकामाचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.

भूमिपूजन करण्यात आलेले काम गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मार्गदर्शन करीत असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्व. नारायण देव बाबा यांच्या स्मृतींना उजाळा दिला. श्री. शिवेश्वर संस्थानच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करू अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.

    यावेळी आमदार उदयसिंग राजपूत, श्री. शिवेश्वर संस्थांनचे नामदेव महाराज, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवचितराव वळवळे ,तालुकाप्रमुख केतन काजे, जि.प.बांधकाम सभापती किशोर बलांडे, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, अवचितराव वळवळे, जि.प.सदस्य संदीप सपकाळ, प.स.सदस्य समाधान गायकवाड, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे, अखिल भारतीय वारकरी संघटनेचे कृष्णा लहाने,  जिल्हा बँकेचे संचालक डॉ. मनोज राठोड, पैठणचे माजी नगराध्यक्ष जितसिंग करकोटक यांच्यासह सुनील पालोदकर,  काकासाहेब जंजाळ , लक्ष्मण गवळी, अलियार पठाण, प्रताप गुजर, नाना येवले आदींची उपस्थिती होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा