संविधान दिन उत्साहात साजरा

संविधान दिन उत्साहात साजरा

औरंगाबाद/ प्रतिनिधी - श्री गजानन विद्यामंदिर रांजणगाव (शे.पु.) व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल आणि श्री गजानन ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली.    
   या प्रसंगी संविधान वाचन करण्यात आले. तसेच  वकृत्व, निबंध,रांगोळी, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मयुरी शेजवळ, प्रिती जाधव, तेजस्विनी काटकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रेक्षकांनी मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर जाधव व प्रमुख मान्यवर प्रा. मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, पालक प्रतिनिधी शालिनीताई वाकोडे, हरीश जाधव, शाळेचे व्यवस्थापक मष्णाजी शिनगारे यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी शाळेचे विद्यार्थी अक्षय दोसपल्ले, प्रतिक वाकोडे, कृष्णा पाटील, प्रज्ञा वाकोडे, श्रेयसी जाधव, मयुरी शेजवळ आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले व विविध स्पर्धेत गायन, निबंधस्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप हिंगणकर व आभार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहाजी मंगनाळे, अशोक तरडे, कल्याण कुलकर्णी, विशाल जाधव, सौरभ लगड, स्वाती सूर्यवंशी, अनुराधा मुळे, संजीवनी चिकाळे, हनुमंत जाधव, दिपक कोळी, मीरा देशपांडे, संजय तुपे, गुलाब मोहिते, गुलाब मुळक, पूजा गिरी, निलिमा रेळेकर आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा