सिल्लोड शहर प्रभाग क्र.12 पोटनिवडणुक शिवसेना उमेदवाराचा दणदणीत विजय
सिल्लोड /प्रतिनिधी - सिल्लोड शहरातील प्रभाग क्र. 12 ( अ ) च्या पोटनिवडणुकीत एकूण 7 पैकी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेससह ईतर 2 जणांचे डिपॉझिट जप्त झाले असून या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार फातमाबी जब्बारखान पठाण यांनी दणदणीत विजय मिळविला. गेल्या निवडणुकीत 500 मतांनी ही जागा विजयी झाली होती. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शन व उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या पोटनिवडणुकीत तब्बल 1700 मतांची आघाडी घेवून या प्रभागात आपले वर्चस्व कायम ठेवले.
या निवडणुकीत एकूण 2799 मतदान झाले. यापैकी शिवसेनेला 2019 मते मिळाली. तर भाजप ला 210, काँग्रेस ला 53, राष्ट्रवादी ला 26, एमआयएम 79 वंचित आघाडी ला 389 मते मिळाली.
या निवडणुकीत भाजप सह इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याने शिवसेनेचा ऐतिहासिक विजय झाला. भाजपसह इतर उमेदवारांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
शिवसेना उमेदवार फातमाबी पठाण यांच्या विजयाची घोषणा होताच शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्र. 12 मध्ये फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशे , गुलाल व पुष्पांची उधळण करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी युवानेते अब्दुल समीर, नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार आदी पदाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार फातमाबी पठाण यांनी प्रभाग क्र. 12 मधील होळी गल्ली, बालाजी गल्ली, मुल्ला गल्ली, तेली गल्ली, गणेश कॉलनी आदी भागातील मतदारांच्या भेटी घेत आभार मानले.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, नगरसेवक शकुंतलाबाई बन्सोड, रउफ बागवान, मनोज झंवर, शेख मोहसीन, विठ्ठल सपकाळ, मतीन देशमुख, प्रशांत क्षीरसागर, अकिल देशमुख, शंकरराव खांडवे, रईस मुजावर, जुम्मा खा पठाण, सुधाकर पाटील, शेख बाबर, आरेफ पठाण, सुनील दुधे,युवासेना शहरप्रमुख शिवा टोम्पे, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बन्सोड,शिवसेना माजी शहरप्रमुख मॅचिंद्र धाडगे, आशिष कुलकर्णी, अमृत पटेल , अकिल देशमुख, फहिम पठाण यांच्यासह शेख अकिल, संजय मुरकुटे, संतोष धाडगे, हाजी राजू देशमुख, कैलास इंगे, रज्जाक मुल्ला, अमोल कुदळ, शेख शमीम, पांडुरंग डवणे, आवेस पठाण,दीपक वाघ, नासेर पठाण, ज्ञानेश्वर कुदळ, देविदास वाकडे, शेख इब्राहिम, जगन्नाथ कुदळ, शेख मुश्ताक, दिलीप वाघ, बबलू पठाण, शेख आबेद, शेख सुलेमान, शेख शाफिक, शेख फेरोज, शेख रफिक आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
प्रभाग क्र. 12 मधील विजय म्हणजे विकासाला चालना देणार
शहरातील मतदारांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब तसेच शिवसेनेवर विश्वास दाखविला त्यामुळे या शहरात शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले असे स्पष्ट करीत हा विजय राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाचा तसेच विकासाला चालना देणारा असल्याचे प्रतिपादन यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला शिवसेनेकडून उमेदवारी दिली. मतदार बांधवांनी मला भरघोस मतांनी विजयी केले. याबाबत विजयी उमेदवार फातमाबी पठाण यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर तसेच मतदार बांधवांचे आभार मानले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागातील लोकांच्या अडीअडचणी सोडविणे तसेच त्यांना नगर परिषदेच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात मी कमी पडणार नाही अशी ग्वाही यावेळी फातमाबी पठाण यांनी दिली.