औरंगाबाद मध्ये अवैध जनावरांची कत्तल
औरंगाबाद /प्रतिनिधी- मोहल्ला सिल्लेखाना येथे अवैध जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमा विरुद्ध आज दि 21 सप्टेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहल्ला सिल्लेखाना येथे अवैध जनावरांची कत्तल न होणे बाबत मनपा अनाधिकृत कत्तल विरोधी पथक गस्त घालत असताना सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मनपा शाळेच्या बाजूला जनावराचे मांस तोडल्याचा मोठ्याने आवाज येत असल्याने पथक कर्मचारी यांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता कत्तल केलेले गोमांसाचे मांस अंदाजे 60 किलो आढळून आले.सदर ठिकाणी याबाबत चौकशी केली असता फारुख सुलेमान कुरेशी वय वर्षे 42,सलीम अ. रहीम कुरेशी वय वर्षे 37 सर्व रा. सिल्लेखाना औरंगाबाद हे आढळुन आले आहे.
त्यांच्या ताब्यातील अंदाजे 60 किलो मांस जप्त करण्यात येऊन त्यांच्या विरुद्ध सय्यद कय्युम सय्यद हुसेन स्वछता निरीक्षक यांच्या फिर्यादीने महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 कलम 5(ब) सुधारणा कलम 2015 नुसार क्रांतिचौक पोलीस स्टेशन औरंगाबाद येथे गुन्हा रजि क्र 0601/2021 दि 21/9/2021 अन्वये दाखल करण्यात आलेले आहे.अशी माहिती प्र. मुख्य पशु संवर्धन अधिकारी महानगरपालिका औरंगाबाद यांनी दिली आहे.