आमले हॉस्पिटल मधील धक्कादायक घटना लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर  जखमी

आमले हॉस्पिटल मधील धक्कादायक घटना लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर  जखमी

रायगड  /प्रतिनिधी -  रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल शहरातील आमले हॉस्पिटलमध्ये धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर  जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

रुग्णालयातील लिफ्टमध्ये बिघाड  होऊन एकाच वेळी 9 डॉक्टरांना दुखापत झाली. दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि ती काही सेकंदातच तळ मजल्यावर येऊन आदळली. या अपघातानंतर तात्काळ अग्निशमन दलातील जवानांना पाचारण करण्यात आलं. फायर ब्रिगेड जवानांनी डॉक्टरांची सुटका करत त्यांना हॉस्पिटलमध्ये  दाखल केलं. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.



रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल शहरातील आमले हॉस्पिटलमध्ये लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुरु करण्यात आलेल्या आमले रुग्णालयात डॉक्टरांसाठी गेट टूगेदरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयाची पाहणी झाल्यावर तिसऱ्या मजल्यावरून 9 डॉक्टर तळ मजल्यावर जेवणासाठी निघाले. मात्र दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट काही सेकंदातच तळ मजल्यावर येऊन आदळली.

लिफ्टमधील सर्व 9 डॉक्टर जखमी

उर्वरित डॉक्टरांनी अग्निशमन दलास पाचारण केले असता अग्निशमन दलातील जवानांनी तात्काळ या सर्व 9 डॉक्टरांना लिफ्टमधून बाहेर काढले. या दुर्घटनेत लिफ्टमधील सर्व 9 डॉक्टर जखमी झाले आहेत. या सर्व डॉक्टरांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या घटनेची नोंद खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा