सकाळी Green Tea पिताय तर ही सवय आजच थांबवा, कारण...
मुंबई : वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला फीट ठेवण्यासाठी सध्या ग्रीन टी (Green Tea) पिण्याचा ट्रेंड लोकांमध्ये दिसून येतो. शरीराला मेंटेन ठेवण्यासाठी ऑफिस, घरात सगळीकडे लोक ग्रीन टीला प्राधान्य देतात. ग्रीन टी शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. ग्रीन टी शरीराला मेंटेन ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. मात्र ग्रीन टी कधी सेवन करावी, याची बहुतेकांना माहिती नसते.
ग्रीन टी बाबत अनेक संभ्रम असून ग्रीन टी रात्री सेवन करायला हवी, असं अनेकांचं मत असतं. तर काहींच्या म्हणण्यानुसार, सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी सेवन करावी. तुमच्याही मनात हा प्रश्न आहे का तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही ग्रीन टीचं सेवन कधी करावं? जेणेकरून तुमचं वजन सहज कमी करता येईल.
रिकाम्या पोटी ग्रीन टी सेवन करणं त्रासदायक?
बहुतांश लोक ग्रीन टी पितात. मात्र त्यांना ग्रीन टी सेवन करण्याची योग्य ही पद्धत माहीत नाही. सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी कधीही पिऊ नये. सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्रत्येकाला पचत नाही. काही लोकांसाठी, सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणं समस्या निर्माण करू शकते.
ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ
ग्रीन टी योग्य वेळी प्यायल्यास त्याचा सकारात्मक फायदा शरीराला होतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी केव्हा प्यावी हे माहित असायला हवं.
सकाळी व्यायाम केल्यानंतर अर्धा तासाने, सकाळी 11 ते 12 दरम्यान, दुपारच्या जेवणाच्या एक तास आधी, संध्याकाळी नाश्ता केल्यानंतर एक तासांनी ग्रीन टी प्यावी. रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिऊ नका, कारण असे केल्याने तुम्हाला झोप येणार नाही.