दरवाजाचा कडी-कोंडा उचकटून ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास
सातारा / प्रतिनिधी - सातारा तालुक्यातील जाधववाडी येथील एका घराच्या दरवाजाचा कडीकोंडा उचकटून रोख रक्कम, दागिने असा ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
ही घटना बुधवार, दि. २ मार्च रोजी रात्री घडली. यानंतर याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जाधववाडी येथील घरात अज्ञात व्यक्तीने घरातील किचनच्या दरवाजाचा कडी आणि कोंडा उचकटून चोरी केली. या चोरीत ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.यामध्ये रोख रक्कम, मोबाईल तसेच सोन्याचे दागिने चोरुन नेले. या घटनेतंर नितीन शंकर शिंदे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली