शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना पहा व्हिडिओ
शाळा म्हणजे विद्येचे पवित्र मंदिर जिथे शिक्षक विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक ज्ञान देतात. शिक्षक विद्यार्थ्यांचा आदर्श असतात परंतु एका शाळेत चक्क मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसमोर शिक्षिकेला चपलेने मारहाण केल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन काय शिकावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्याध्यापक शिक्षिकेला मारहाण करताना चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडिओत शाळेचे मुख्याध्यापक शिक्षिकेला चपलेने मारहाण करताना दिसत आहे. एवढंच काय तर याला प्रतिउत्तर म्हणून शिक्षिकाही मुख्याध्यापकाला मारहाण करताना दिसत आहे.या मारहाणीमागील कारण ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल.
शिक्षिका एक दिवसापूर्वी गैरहजर होती, असे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी या शिक्षिकेने रजिस्टरमध्ये स्वत:ला गैरहजर असल्याचे पाहिल्यानंतर शुक्रवारी ती तक्रार करण्यासाठी मुख्याध्यापकांकडे गेली. त्यांची तक्रार ऐकून मुख्याध्यापक संतापले आणि त्यांनी मुलांसमोर चक्क शिक्षिकेवर चप्पल काढली. मुख्याध्यापकांच्या या कृतीमुळे शिक्षकसंघही संतापलाय आणि या प्रकरणावर जाहीर निषेध व्यक्त करत आहे.