पुद्दुचेरी व पॉंडीचेरी एक्स्प्रेसला मोठा अपघात डबे रुळवरून घसरले

पुद्दुचेरी व पॉंडीचेरी एक्स्प्रेसला मोठा अपघात डबे रुळवरून घसरले

मुंबई /प्रतिनिधी -    माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ काल रात्री पावणे दहाच्या सुमारास  रेल्वे क्रमांक 11005 दादर पुद्दुचेरी एक्स्प्रेसला मोठा अपघात झाला. गदक एक्सप्रेस आणि पॉंडीचेरी एक्सप्रेस बाजूने एकमेकांवर आदळल्या, या दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात होत्या आणि क्रॉसिंगवर एकाच ट्रॅकवर आल्या त्यामुळे हा अपघात झाला.यामध्य पॉंडीचेरी एक्सप्रेसचे शेवटचे डबे रेल्वेरुळावरून घसरले.

दादर-माटुंगादरम्यान झालेल्या हा रेल्वे अपघात ट्रॅक बदलताना दोन रेल्वे एकमेकांवर आदळल्याने झाला. अपघातादरम्यान इंजिनजवळ आग देखील लागल्याचे समोर आले. यानंतर सीएसटीच्या दिशेने जाणारी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान आपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही असे, मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे.

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत
दादरहुन ही एक्स्प्रेस रवाना होताच माटुंगा स्थानकाजवळ हा अपघात झाला. डबे रुळावरून घसरले असले तरी, या अपघातात आतापर्यंत कोणालाही दुखापत झाली नाही, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. दरम्यान, अभियांत्रिकी पथक, पोलिस, आरपीएफ कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, घटना स्थळी दाखल झाले. गाडीतील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत आहेत, तर गाडीतील काही प्रवाशांनी घाबरून घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगण्यात आले.

वाहतुक पूर्वरत करण्यासाठी काम सुरू

यानंतर मध्य रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली असून दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील जलद आणि एक्स्प्रेस गाड्या पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थगित झाल्याने CSMT स्टेशनवर खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली.  या घटनेचा तपास केला जाईल, त्यासोबतच वाहतुक पूर्वरत करण्यासाठी काम सुरू आहे असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा