भाकपची पदयात्रा ! चार दिवसांनी आयुक्ताच्या बंगल्यावर पाणी मागायला जाणार !

भाकपची पदयात्रा ! चार दिवसांनी आयुक्ताच्या बंगल्यावर पाणी मागायला जाणार !

औरंगाबाद / प्रतिनिधी - शहानुरमियाॅ दर्गा जवळील शंभुनगर भागात पाणी पुरवठा करा, ड्रेनेज लाईन टाका, नाल्यावर संरक्षक भिंत बांधा, पावसाचे साठलेल्या पाण्यामुळे रोगराई होऊ नये म्हणुन भराव टाका, उघड्या मेनहोलवर ढापा टाका या व इतर मागण्यांसाठी शंभुनगर ते मनपा टाऊन हाॅल कार्यालया  पर्यंत पदयाञा काढुन अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना निवेदन देण्यात आले.        

  याबाबत असे की, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत रुजु होऊनही ते एकदाही कार्यालयात उपलब्ध झालेले नाहीत, भाकपने दोन दिवसांपुर्वी निवेदन देऊन कळवल्यानंतरही आयुक्त मनपा कार्यालयात उपलब्ध नव्हते, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भारतीय महीला फेडरेशन च्या शंभुनगर शाखेतर्फे ठरल्याप्रमाणे शंभुनगर, शहानुरमियाॅ दर्गा , अमरप्रित चौक, पैठणगेट, सिटी चौक मार्गे मनपा कार्यालय टाऊन हाॅल पर्यंत पदयाञा काढण्यात आली. पदयाञेनंतर निदर्शने करुन अतिरीक्त आयुक्त सौरभ जोशी यांना निवेदन देण्यात आले. निदर्शनाच्या वेळी घोषणांनी मनपा गेट दणाणुन गेला, गतिमान सरकार कुठे गेले जवाब दो, पाणी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच, जी श्रीकांत कहाॅ है जवाब दो इत्यादि घोषणा देण्यात आल्या. यावेळी दिलेल्या निवेदनात शंभुनगर मधील गल्ली नंबर 3 मध्ये शहेनाझ बेगम यांच्या घरापासुन शेख नसरीन यांच्या घरापर्यंत ड्रेनेज लाईन टाका व नंतरच सीमेंट रोड करा, गादिया विहार ते दर्गा रोड दरम्यान असलेल्या जनता चिकन सेंटर व बिकानेर स्विट जवळील उघड्या मेन होलवर ढापा टाका, शंभुनगर गल्ली नं. 2 अलबर मस्जिद जवळ अजिमभाई दुध वाले तसेच शेख नईम ,रतन बनसोडे, राजु दौलत वाघ गल्ली नं. 4 व 5 यांच्या घरासमोर पाणी तुंबले आहे तेथे डास होऊन रोगराई पसरण्याचा धोका असल्याने तत्काळ भराव टाकावा व औषध फवारणी करावी, शंभुनगर मधील गल्ली नं. 3 मध्ये ड्रेनेज लाईन टाकुन दर्जेदार सिमेंट रोड करा, शंभुनगर गल्ली नं. 2 मध्ये सिमेंट रोड करा, गल्ली नं. 3 मध्ये शेख नसरिन शेख वाजेब यांच्या घरासमोर ड्रेनेज लाईन व सिमेंट रोड करा, शंभुनगरला लागुन असणार्या नाल्याला संरक्षक भिंत बांधा. स्ट्रीट लाईट सुरु करा इ मागण्यांचा निवेदनात होता.  पदयाञेत  अभय टाकसाळ, काॅ राजु हिवराळे, काॅ. जफर खान फजलु रहमान खान, शेख हनिफ शेख अहमद यांनी सहभाग घेतला तर याच्यासह सफीया शेख राजुद्दीन खुदुसिया खमर जफर खान, रुबिना बेगम जफर खान, शनिम बेगम शेख खाजा, यासमिन बेगम, तसलीमबी शेख पाशा, रिजवाना बेगम सय्यद अकबर, अबुजर खान , अब्दुल रहमान खान, शेख एजाज शेख याकुब यांच्यासह इतरांनी सहभाग घेतला. 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा