मेल्ट्रोनसह  9 हॉस्पिटलच्या विकासासाठी  निधीची मागणी

मेल्ट्रोनसह  9 हॉस्पिटलच्या विकासासाठी  निधीची मागणी

औरंगाबाद/ प्रतिनिधी-  मनपा मेल्ट्रोन रुग्णालयाच्या विकासासाठी 22 कोटी तसेच  इतर 9 रुग्णालयाचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी निधीची मागणी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी दिली.
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज  औरंगाबाद दौऱ्यावर आले असता  सिव्हिल हॉस्पिटल येथे झालेल्या बैठकीत आरोग्य संदर्भातील प्रलंबित विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला सिव्हिल सर्जन मुरंबीकर, डीएचओ शेळके व महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा हे उपस्थित होते.
  यामध्ये प्रामुख्याने मेल्ट्रोन रुग्णालयाच्या विकासासाठी निधीची मागणी केली असून जिनो सिक्वेन्सिग लॅब आणि संसर्गजन्य हॉस्पिटल म्हणून विकास करण्यासाठी 22 कोटी रुपयांची  तर महानगरपालिकेच्या  नऊ हॉस्पिटलमध्ये  डायलेसिस युनिट, सोनोग्राफी सेंटर, नेत्र चिकित्सक सेंटर, 24 तास मॅटर्निटी हॉस्पिटल आदी अद्यावत सेवेसाठी  निधीची मागणी केली आहे. तसेच कोविड टेस्टिंग, व्हॅक्सिनेशन वाढवण्यासाठी मनुष्यबळ लागणार असून त्यांच्या पगारासाठी एस डी आर एफ फंडातून निधी देण्याची मागणी ही डॉक्टर पारस मंडलेचा यांनी केली आहे.

महालॅब सेवा देण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आदेश
विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या 40 आरोग्य केंद्रापैकी फक्त 14 आरोग्य केंद्रात महालॅब ची सेवा देण्यात येते. उर्वरित 26 आरोग्य केंद्राला ही महालॅब ची सेवा देण्यात यावी, या मागणीची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दखल घेऊन मुंबईची आरोग्य संचालक डॉक्टर सतीश पवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून महानगरपालिकेच्या 26 आरोग्य केंद्राला महा लॅब सेवा देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती डॉक्टर पारस मंडलेचा  यांनी दिली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा