अ ब ब! अजगर जातीचा एवढा मोठा साप औरंगाबादमध्ये
औरंगाबाद/प्रतिनिधी - पंढरपूर येथील तिरंगाचौका मधील एका घरात अजगर जातीचा सर्प आढळून आला होता,या सर्पाचा पंचनामा करत वनविभागाच्या अधिकाऱ्या समक्ष सातारा परिसरातील डोंगरात सोडण्यात आला.
छोट्या पंढरपूर येथील तिरंगाचौकात 3 डिसेंबर शनिवारी रोजी अजगर जातीचा मोठा 8 फूट सर्प निघाल्यामुळे स्थानिक नागरिकां मध्ये घबराट निर्माण झाली होती.येथील काही नागरिकांनी सर्प मित्र सुरेश साळवे यांना याची तत्काळ माहिती दिली, सर्प मित्र साळवे व त्यांच्या टीम ने त्वरित घटनास्थळी पाहोचून रेस्क्यू करून अजगर सर्प ताब्यात घेत.
सदर बाब औरंगाबाद वनविभागाच्या अधिकाऱ्या समक्ष माहिती देत पंचनामा करत सातारा परिसरातील डोंगरात जाऊन अजगराला सोडण्यात आले.
या वेळी वनविभागाचे अधिकारी दादासाहेब तावर ,वनपाल एस बी तागड ,सर्प मित्र संघानद शिंदे ,सुरेश साळवे ,सतीश कांबळे ,व्यकटेश कुलथे ,सह वन विभागातील अधिकारी यांची या वेळी उपस्थिती होती.