आयुष डॉक्टरांचा मनपा वर फसवणुकीचा आरोप
औरंगाबाद /प्रतिनिधी- कोरोंना संकट काळात अहोरात्र आरोग्य सेवा देणाऱ्या आयुष डॉक्टराना मनपा प्रशासनाने मंजूर केलेल्या मानधना पेक्षा कमी वेतन देऊन मनपा आमची फसवणूक करत असल्याचा आरोप करत आयुष डॉक्टरांनी प्रशसनाच्या विरोधात रोष व्यक्त केला.
महानगरपालिका आरोग्य विभागाने कोरोंनाचा दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने आयुष डॉक्टरची भरती केली होती. भरती करताना नियुक्ती पत्रावर 50 हजार रुपये वेतन देण्यास मान्यता दिली होती, या नुसार सर्व डॉक्टर शहरातील विविध कोरोंना सेंटर आणि आरोग्य केंद्रावर रुजू झाले. परंतु डॉक्टरांना मार्च या एकच महिन्याचा पगार आरोग्य विभागाने दिला तेंव्हापासून एप्रिल ते ऑगस्ट पर्यंत 5 महिण्याचे वेतन थकीत आहे. थकित पगाराची वारंवार मनपा आरोग्य विभागाकडे मागणी करून देखील प्रशासनाने निधी उपलब्ध नसल्याकारणाने वेतन देता येत नाही अशी भूमिका घेतली. तर आता निधी येताच आयुष डॉक्टरांना 50 हजार वेतन न देता फक्त 30 हजार वेतन दिले जाईल अशी भूमिका आरोग्य विभागाने घेतल्या मुळे संतप्त डॉक्टरांनी आज मनपा मुख्यालयात येउन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मांडलेचा यांची भेट घेतली. आणि गेल्या 5 महिण्याचे 50 हजार रुपयाप्रमाणे वेतन अदा करावे अशी मागणी केली. 30 हजार वेतन मान्य नसून मनपा प्रशसनाने आमची फसवणूक केली आणि आता आम्हाला वेतना साठी वेठीस धरत असल्याचा आरोप शिष्टमंडळातील आयुष डॉक्टरानीं केला आहे.