ट्रक दुचाकीच्या अपघातात एक जण ठार दोन जखमी

ट्रक दुचाकीच्या अपघातात एक जण ठार दोन जखमी

औरंगाबाद/ प्रतिनिधी - औरंगाबाद वैजापूर रस्त्यावरील साजापूर चौफुली येथे ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन जणांपैकी एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज (9 जानेवारी) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून जखमींना घाटी रुग्णालयात रवाना केले.
        साजापूर गावातून सोलापूर धुळे महामार्गे ए एस  क्लबकडे जाण्यासाठी वळण घेत असताना साजपुर चौफुली येथे पाठीमागून येत असलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवर असलेले तिघेजण रस्त्याच्या कडेला पडले. यामध्ये एकाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.  जखमींना घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना घाटी रुग्णालयात रवाना केल्याची माहिती समोर येत आहे.  अपघातग्रस्तांची ओळख पटलेली नसून  हे तिघेजण बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी कडून मिळाली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा