भेटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केले लग्न तिसऱ्या दिवशी दाग दागिने घेऊन नवरी पसार
भोकरदन / प्रतिनिधी : तालुक्यातील पारध येथे एका शेतकरी परिवारामध्ये हिंगोली जिल्ह्यातील नववधू सोबत दोन दिवसांपूर्वी एका मंदिरात लग्न करण्यात आले होते. नववधू रात्रीच्या वेळी रोख रक्कम आणि अंगावरील दागदागिने असा अंदाजे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झाली. ही घटना परत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सेलू येथील काकडे परिवार यांच्यासोबत घडली.
याप्रकरणी पारद पोलीस स्टेशन मध्ये 90 सह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व आरोपी अद्यापही फरार आहेत या शेतकरी परिवारांना या टोळ्या लग्नाचे आमिष दाखवून नवरी पाहून देतो म्हणत लग्न लावून देतात आणि फसवतात.
तुकाराम शिंदे, सुनीता शिंदे, सोनू दिलीप जाधव, दिलीप जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत म्हणून खात्री करूनच सोयरीक करणे योग्य आहे.