अर्थ संकल्प बाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांची प्रतिक्रिया

अर्थ संकल्प बाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांची प्रतिक्रिया

देशातील कर्मचारीवर्ग, मध्यमवर्गीय आणि गरीब सध्या महागाईमुळे त्रस्त आहेत. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातून त्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचे नसून श्रीमंतांचा आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे आश्वासन दिले होते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी काम करू असे म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर किती गंभीर आहे हे यावरून दिसते. देशातील सर्वात मोठा वर्ग पगारदार आहे त्यांचे लक्ष अर्थसंकल्पातील एकाच गोष्टीवर असते. ते म्हणजे आयकर मध्ये सवलत. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकर मध्ये कोणती सवलत दिली नाही. त्यामुळे नोकरदार वर्गाची निराशा केली आहे. महागाई वाढल्याने करांमध्ये सूट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अर्थसंकल्पातून तसं काहीच दिसले नाही. तरुण, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजच्या अर्थसंकल्पात साठ लाख लोकांना रोजगार देण्याचे सांगण्यात आले. म्हणजे पंतप्रधान मोदी सुद्धा दिलेले आश्वासन पाळत नाही असे यावरून दिसते. देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्हता असलेली कंपनी म्हणजे एलआयसी तिलाच विकण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे देशाची संपत्ती विकून देश चालवण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा