पोलिसांच्या कार्यतत्परतेचे उत्तम उदाहरण अमूल्य वस्तू व रोख रकमेसह पर्स शोधली
औरंगाबाद/प्रतिनिधी - पोलिसांचे कार्य तत्परतेमुळे एका महिलेस तिच्या मूल्यवान वस्तू परत मिळाल्याची घटना नुकतीच घडली आहे. हरसुल भागातील रहिवासी चंद्रभागा राठोड या महिलेची पर्स हरवली होती. घटनेची माहिती मिळताच हरसुल पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत लगेच पर्स शोधून आपल्या कर्तव्यदक्षतेचे उत्तम उदाहरण सादर केले आहे.
चंद्रभागा दगडू राठोड (वय 3८ रा. छत्रपती नगर हर्सुल) यांनी हर्सूल पोलीस स्टेशन ल येऊन कळविले की त्यांची पर्स ज्यामध्ये दोन मोबाईल कानातील सोन्याचे झुंबर बारा ग्रॅमचे, अंगठी पाच ग्रॅमची व रोख तीन हजार पाचशे रुपये असलेली पर्स पिसादेवी रोडला कुठेतरी हरवली आहे. ही माहिती मिळताच ऑफिसर पो उप निरीक्षक ठोकळ यांनी डी.बी.स्टाफ चे पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस अंमलदार गुंजाळ पोलीस अंमलदार शिवाजी शिंदे यांना सदरची माहिती दिली. पोलिस निरीक्षक पाथारे सायबर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत सदर हरवलेल्या मोबाईलचे तात्काळ लोकेशन घेऊन सदर लोकेशनवर डीबी स्टाफचे अंमलदार यांना रवाना केले. डीबी स्टाफचे अंमलदार यांनी हरवलेली पर्सचा लोकेशन वर शोध घेतला असता पर्स मिळून आली . मोबाईल व सोन्याच्या दागिनेसह पर्स महिला नामे चंद्रभागा दगडू राठोड यांना ताब्यात देण्यात आली. पोलिसांच्या या कर्तव्यदक्षते बद्दल व कार्यतत्परते साठी सदर महिलेने त्यांचे आभार मानले.