मनपा आयुक्तांनी दिले नवे आदेश

मनपा आयुक्तांनी दिले नवे आदेश

औरंगाबाद/प्रतिनिधी - शहराच्या विकासात भर टाकणाऱ्या  विविध नव्या विकास प्रकल्पाच्या व मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव नगरविकास यांच्याकडे सादर केलेल्या विकास प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेऊन कामे सूरू करण्या संदर्भात काही अडीअडचणी येत असल्यास त्या तातडीने सोडवून प्रस्तावित प्रकल्पांची कामे दिलेल्या कालावधीत पूर्ण करा, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले.
        महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात आज मंगळवारी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत महानगरपालिकेच्या नविन मुख्य प्रशासकीय इमारतीच्या जागाबाबत प्राथमिक चर्चा झाली.हर्सूल घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या जागेचा व कामाची प्रगती, शहरात विविध महिला व पुरुष प्रत्येकी 50 शौचालय 5आक्टोबरपर्यत पूर्ण करा, पैठण गेट येथील  बहुमजली पार्किंग उभारणेबाबत पीएमसी नियुक्त करण्याचे आदेश मनपा प्रशासकांनी आदेश दिले. महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या पाच पेट्रोल पंप व ई चार्जीग स्टेशन उभारणे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव नगर विकास यांच्याकडे सादर केलेल्या  317 कोटी रूपयाच्या रस्त्याचा तसेच सातारा देवळाई येथील भूमिगत गटार डीपीआर व शहरातील उर्वरित भुमिगत गटार, 252 कोटी रुपये रस्त्याच्या कामाच्या प्रगती आदी विकास प्रकल्पाच्या कामांचा व शहरातील विविध चौकातील वाहतूक बेटे विकासित करणे व एनजीओला दत्तक देणे, उड्डाण पूलाखालील जागा विकासित करणे आदी विकास कामाबाबत चर्चा करून  कामाचा आढावा घेतला.सदरील कामाबाबत असणाऱ्या अडचणी सोडवून कामाला सुरुवात करा, वेळ काढूपणा व दिरंगाई केल्यास कारवाई केली जाईल,असा इशारा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने,मनपा शहर अभियंता एस. डी.पानझडे, सहाय्यक संचालक नगर रचना जयंत खरवडकर,घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, मुख्य लेखा अधिकारी संजय पवार, उपायुक्त अपर्णा थिटे, कार्यकारी अभियंता ड्रेनेज बी.डी.फड, कार्यकारी अभियंता यांत्रिकी डी.के.
पंडीत, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद आदी उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा