पेंट शॉपला भीषण आग जवळपास १ कोटीचे नुकसान

पेंट शॉपला भीषण आग जवळपास १ कोटीचे नुकसान

वाळूज / प्रतिनिधी - वाळूज येथील एलएपीएल ऑटोमोटिव्ह या कंपनीच्या पेंट शॉपला आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.आगीत कंपनीचे पेंट शॉप जळून खाक झाले आहे. या आगीत शॉपचे जवळपास १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
एलएपीएल ऑटोमोटिव्ह या वाळूज उद्योगनगरीतील कंपनीत दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांचे इंडिकेटर तयार केले जाते. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास कंपनीच्या पेंट शॉपला अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य, मशीन्स जळून खाक झाले.

जवळपास एक ते दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीचे सुनील धारपूरकर यांनी व्यक्त केला. कंपनी चे मालक नीरज गोयल हे दिल्ली येथे गेले असून आगीचे कारण समजू शकले नाही.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा