स्फोटकांच्या ट्रकला दुचाकीची धडक भिषण स्फोट

स्फोटकांच्या ट्रकला दुचाकीची धडक भिषण स्फोट

घनामध्ये स्फोटकांच्या ट्रकला दुचाकीची धडक होऊन  भीषण स्फोट झाला आहे.  यामध्ये १७ जण मृत्यूमुखी पडले असून ५९ जण जखमी झाले आहेत.  परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

हा स्फोट इतका भयंकर होता की यामध्ये १० ते १२ इमारती जमीनदोस्त झाल्या तर शेकडो इमारतींचे नुकसान झाले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये १७ जण मृत्यूमुखी पडले असून ५९ जण जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एक ट्रक सोन्याच्या खाणीत स्फोटकं नेत होता. त्यावेळी ट्रकची धडक मोटारसायकलला झाली. यानंतर मोठा स्फोट झाला. सोशल मीडियावर आता स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पोलिसांनी याबाबत सांगितलं की, प्राथमिक चौकशीत असं समोर आलं की, खाणीसाठी स्फोटकं नेणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक बसली. त्यानंतर झालेल्या स्फोटात १७ जणांनी प्राण गमावले. लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून इतर सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा