वाळूज औद्योगिक वसाहत हिरवेगार ठेवण्यासाठी देवगिरी समूह सदैव तत्त्पर- किशोर शितोळे

वाळूज औद्योगिक वसाहत हिरवेगार ठेवण्यासाठी देवगिरी समूह सदैव तत्त्पर- किशोर शितोळे

औरंगाबाद/ प्रतिनिधी - देशात कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असतांना वाळूज औद्योगिक वसाहत हिरवेगार ठेवण्यासाठी देवगिरी समूह सदैव तत्त्पर राहील असे प्रतिपादन ङाँ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सदस्य तथा देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी आयोधयानगर येथील श्री दत्ताञय मंदीरात(दि.25)रोजी  आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी परीसरात विविध जमातीची वृक्ष लावण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी राष्ट्रीय किसान  बहुजन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष  अर्जुनराव गालफाङे,पंचायत समिती सदस्य सतिश पाटील, देवगिरी बँकेचे शाखाअधिकारी नंदकिशोर निधोनकर, मारोती गायकवाड  युवा जिल्हा अध्यक्ष सोमनाथ गालफाङे, बबन गायकवाड , स्वप्नील गालफाङे आदीची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुञसंचलन ङाँ.संजय सांभाळकर यांनी तर प्रास्तविक आणि आभार कार्यक्रमाचे आयोजक अर्जुनराव गालफाङे यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता पांङुरंग   भारसकर,भगवान निकम, प्रेम गालफाङे, गोंविद शिंदे , बबन गायकवाड ,  परमेश्वर सगट,सतीश हिवाळे,राजेश ससाने,सूर्यकांत नवगिरे आदीनी परीश्रम घेतले .

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा