रजिस्ट्रेशन डेटपासून फेलोशिप देण्याची सारथीकडे मागणी 551 संशोधक विद्यार्थी करणार बेमुदत धरणे आंदोलन

रजिस्ट्रेशन डेटपासून फेलोशिप देण्याची सारथीकडे मागणी 551 संशोधक विद्यार्थी करणार बेमुदत धरणे आंदोलन

कोल्हापूर / प्रतिनिधी : सारथीच्या संशोधक विदयार्थ्यांना रजिस्ट्रेशन तारखेपासून फेलोशिप मिळावी यासाठी विद्यार्थी गेले कित्येक महिन्यानपासून  वेळोवेळी मराठा समाजातील नेते उपमुख्यमंत्री  अजित पवार, गृहराज्यमंत्री  सतेज पाटील , खासदार  धैर्यशील माने, ग्रामविकास मंत्री हसन मुशीफ, आमदार ऋतुराज पाटील, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुजय विखे पाटील अश्या सर्वच मराठा सामाज्यातील लोकप्रतिनिधीयांना वेळोवेळी निवेदने देवून आपल्या व्यथा त्यांच्या समोर व्यक्त केल्या आहेत. पण कोणताही मराठा समाजाचा नेता मराठा समाजाच्या विदयार्थ्यांच्या पाठीशी ठाम पणे उभा राहिलेला नाही व आश्वासनांच्या पलिकडे विदयार्थ्यांना काहीही मिळालेले नाही.


 याउलट बार्टी व महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांनच्या मागण्या त्यांच्या सामाजातील नेते धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, विजय वडटीवार हे पाठपुरावा करून त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांच्या सामाजातील मुलांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. हे पाहून मराठा सामाज्यातील विध्यार्थी आपल्या मराठा सामाजातील नेत्यांनवर नाराजी व्यक्त करत आहेत. शासनाच्या व नेत्यांच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे संशोधक विद्यार्थ्याची सध्या फरफट चालू आहे. त्यामुळे विदयार्थ्याच्या मनात त्यांच्या संदर्भात रोष निर्माण झालेला आहे.

आपल्या मागणीसाठी संशोधक विध्यार्यांनी यापूर्वी २८ फेब्रुवारीला झालेल्या आंदोलनामध्ये  15 मार्चला संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णन घेतला जाईल असे आश्वासन देवून डेक्कन जिमखाना पोलीसांच्या मद्यस्थिने आंदोलन स्थगित केले होते. परंतु आज एप्रिल महिना उलटला अजूनही संचालक मंडळाची बैठक पार पडली नाही आणि विद्यार्थ्यांनच्या मागणीवर कोणताही निर्णय दिलेला नाही.मागील सर्वं घडामोड पाहता आता सारथीचे सर्व 551 संशोधक विद्यार्थी नाराज असून ते 11 एप्रिलला बेमुदत धरणे उपोषणाला बसणार आहेत व जो पर्यंत मागणी मान्य करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे नाही घेणार असा निर्धार सर्वं संशोधक विध्यार्यांनी घेतला आहे व याची पूर्ण जबाबदारी सारथी संस्थेची व महाराष्ट्र शासनाची असणार आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा