रांजणगाव येथे पतीने काढला पत्नीचा काटा
औरंगाबाद / प्रतिनिधी
जुन्या वादाच्या कारणावरून घटस्फोट दिलेल्या पत्नीचा पतीने चाकू भोसकून खून केल्याची घटना गुरूवारी (दि. १८) रात्री रांजणगाव परिसरातील दत्तनगर भागात घडली. शिवकन्या किरण खिल्लारे (२३) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पोलीसांनी खून करणाºया पतीच्या काही तासात रेल्वेस्टेशन येथे मुसक्या आवळल्या़.
सतत भांडणांच्या कारणावरून पती सोबत घटस्फोट घेत चार वर्षीय मुलीसह माहेरी आईकडे राहणाºया शिवकन्याला भेटायला आलेला पती किरण केशव खिल्लारे (३५, रा. देहगाव, जि. नांदेड ) यांने शिवकन्याची आई जनाबाई कैलास सतावे (५२) या घराबाहेर गेल्याची संधी साधुन पती-पत्नीमध्ये मागील भांडणाच्या कारणावरून शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान किरणने सोबत आणलेल्या चाकूने शिवकन्यावर सपासप वार करून पळ काढला. ही माहीती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी आपले अधिकारी पोउपनि राजेंद्र बांगर आणि कर्मचारी प्रकाश गायकवाड, अविनाश ढगे यांच्यासह घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली असता खून करणारा पती हा मुख्य रस्त्याने पळून गेल्याची माहीती मिळाली त्यांनी ही माहीती पोलीस आयुक्तालयात दिल्यानंतर आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली असता गुन्हे शाखेचे पोउपनि जोधंळे यांनी खुन करून पळण्याच्या तयारीत असलेला आरोपी किरण खिल्लारे यास रेल्वेस्टेशन येथून रात्री अकराच्या सुमारस अटक केली. असल्याची माहीती समोर आली आली आहे दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ यांनी घटनास्थळी भेट दिल्याची माहीती समोर आली आहे.