प्रेमामध्ये जात आली अन् सैराट ची पुनरावृत्ती झाली
लातूरच्या टाकळी गावातील लहानपणापासूनच शेजारी राहून प्रेम करणाऱ्या जोडप्यातील एकाचा दुर्दैवी अंत झाला. दोघांचे एकमेकावर प्रेम होते परंतु जात वेगळी होती. त्यात मुलगा 18 वर्षाचा व मुलगी 20 वर्षाची होती.
लहानपणा पासून एकमेकांना पाहीलेलं. ते दोघे जसे तरुण होत गेले तसे ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हे त्यांनाच कळलं नाही. पुढे शिक्षणा निमित्ता दोघे ही लातूरला गेले. तो आयटीआयचं शिक्षण घेत होता. तर ती पदवीचं शिक्षण घेतलं. पण प्रेमामध्ये जात आली अन् तिथचं होत्याचं नव्हतं झालं. हे सर्व चित्रपटाला शोभेल असं वाटत असलं तरी अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. तीही लातूर जिल्ह्यातील टाकळी या गावामध्ये.
लातूर जिल्ह्यात सैराटची पुनरावृत्ती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचा दोन महिन्याच्या उपचारादरम्यान दुर्वैवी मृत्यू झाला आहे. लातूरपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या टाकळी गावात माऊली उमेश सोट या अठरा वर्षीय तरुणाचं घराशेजारी राहणाऱ्या मुलीशी प्रेम संबंध जुळले.उमेश सोट हा आयटीआयचं शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे. तर पदवीचं शिक्षण घेत असलेल्या मुलीशी त्याचं प्रेम जुळलं होते. त्यांच्या प्रेमाचा अंत अशा दुर्दैवी पद्धतीने होईल असं कुणीही विचार केला नसेल.
गेल्या एक वर्षापासून दोघांमध्ये अनेक गोष्टी घडल्या. डिजिटलच्या जमान्यात सुद्धा ते दोघे एकमेकांना प्रेम पत्र पाठवून आपलं प्रेम व्यक्त करत होते. जीवन मरणाच्या शपथा खात होते. पुढे जाऊन आपण लग्न करून सुखी संसार करण्याचं स्वप्न डोळ्यात होतं. मुलीकडून अनेकदा माऊलीला पळून जाऊन लग्न करण्याचा तगादा लावला जात होता. एकमेकांना रोज भेटून बोलणं हे दोघांचं नित्याचं ठरलेलं होत. कालांतराने दोघांच्याही घरी प्रेमाची भांडाफोड झाली. दोघांच्याही प्रेमाला कुणाची नजर लागली माहित नाही.
दोघांच्या ही स्वप्नाचा भ्रमनिराश झाला. मुलीच्या कुटुंबियांना माहित झालं की, आपल्या मुलीचे गावातीलच एका खालच्या जातीच्या मुलाशी प्रेम प्रकरण सुरू आहे. माऊली हा त्या मुली पेक्षा खालच्या जातीचा होता. याची माहिती कळताच मुलीच्या कुटुंबीयांची तळ पायाची आग मस्तकाला गेली. यातूनच माऊलीला जिवे मारण्याचा कट शिजवला गेला. मुलीच्या कुटुंबीयांनी माऊलीशी बोलायचं आहे असा निरोप एक जणाकडे पाठवला होता. घरात आराम करत असलेला माऊली एका हकेवर घरातून बाहेर पडला. आई वडील हाक मारेपर्यंत माऊली रोडवर गेला. त्यामुळे त्याला आवाज आला नसावा. घरातून निघालेल्या माऊलीला माहित नव्हतं की आपण ज्यासाठी जातोय,तिथे आपल्याला मारण्यासाठी काही जण वाट पाहत बसले आहेत.
मुलीच्या कुटुंबीयांच्या समोर माऊली उभा टाकला. मुलीच्या वडिलांनी माऊलीला पाहताच त्यांच्या रागाचा पारा चढला. माऊलीला काही कळायच्या आतच त्याला 10 ते 15 जणांच्या टोळक्याने काठ्या आणि रॉड ने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण इतकी भयाण होती की माऊली जागेवरच रक्तबंबाळ झाला होता. जमिनीवर एकचीत पडलेला होता. लोकांनी माऊलीच्या आई वडिलांना निरोप दिला की तुमच्या माऊलीला खूप मारहाण करण्यात आली आहे. हे ऐकून त्यांच्या आईवडीलांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी माऊलीच्या दिशेने धाव घेतली.
ते तिथे पोहेचले त्यावेळी माऊली रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याची स्थिती गंभीर होती. त्यामुळे त्याला लातूरला हलवण्यात आलं. मारहाण इतकी जबर होती की माऊली कोमात गेला होता. त्याच्या अंगावर सर्व ठिकाणी वार करण्यात आले होते. पाय फॅक्चर करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्या पासून त्याच्यावर उपचार सुरू होते. तो मृत्यूशी झुंज देत होता. शेवटी त्याची ही झुंज अपयशी ठरली. त्याचा शेवटी मृत्यू झाला. त्याच्या हत्येचा गुन्हा आता नोंदवण्यात आला आहे.