डॉक्टर्स फॉर यु संस्थेचा उपक्रम 100 ऑक्सिजन काँसंट्रेटर महानगर पालिकेस भेट काय आहे ऑक्सिजन काँसंट्रेटर चा उपयोग पहा

डॉक्टर्स फॉर यु संस्थेचा उपक्रम 100 ऑक्सिजन काँसंट्रेटर महानगर पालिकेस भेट काय आहे ऑक्सिजन काँसंट्रेटर चा उपयोग पहा

औरंगाबाद/ प्रतिनिधी-   औरंगाबाद महानगर पालिका प्रशासक तथा आयुक्त श्री आस्तिक कुमार पांडेय यांनी आज डॉक्टर्स फॉर यु या संस्थेमार्फत महानगर पालिकेस देण्यात आलेले ऑक्सिजन काँसंट्रेटर ची पाहणी केली.
डॉक्टर्स फॉर यु या सेवाभावी संस्थेतर्फे औरंगाबाद महानगरपालिकेला सीएसआर फंडातून एकूण 100ऑक्सिजन काँसंट्रेटर देण्यात आलेले आहे. ऑक्सिजन काँसंट्रेटर चा उपयोग  कोविड रुग्णांमध्ये घसरलेली ऑक्सिजन ची पातळी स्थिर ठेवण्यासाठी केला जाईल. सदरील मशीनचा उपयोग महापालिका संचलित  मेल्ट्रोन हॉस्पिटल,इओसी पदम पुरा,गरवारे ,एन 11 आणि एन 8 हॉस्पिटल येथे केला जाणार आहे.यावेळी  महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा ,वैद्यकीय अधिकारी डॉ राठोडकर,श्री निरज मान उपायुक्त बीएसएफ लातूर व इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. याशिवाय डॉक्टर्स फॉर यु या संस्थेने औरंगाबाद महापालिकेचे पाच लसीकरण केंद्र बन्सीलाल नगर,राज नगर,जवाहर कॉलनी,मुकुंदवाडी आणि एन 8 हॉस्पिटल हे दत्तक घेतले असून प्रत्येक केंद्रावर संस्थेचे 8 कर्मचारी कार्यरत आहेत.सदरील मनुष्यबळाचे वेतन संस्थेमार्फत अदा केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा