पिण्याचे पाणी विस कोटींचा अपहार वडगाव को.ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा

पिण्याचे पाणी  विस कोटींचा अपहार  वडगाव को.ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा

औरंगाबाद / प्रतिनिधी -  वाळूज आद्योगिक वसाहती मधील वडगाव (को.)या ग्रामपंचायती मध्ये चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून सुमारे विस कोटीचा अपहार करून नागरिकांना पिण्याचे पाणी आणि विविध योजना न दिल्याने व ग्रामपंचायत चे सदस्य नसतांनाही लुडबुड करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा या मागणी साठी मराठवाडा बहुजन आघाडीच्या वतीने भव्य हंडा मोर्चा काढण्यात आला होता,  सदर मोर्चा जि.प.सदस्य रमेश गायकवाड,प्रकाश निकम रमेश बागुल, सतीश पवार आदीच्या नेतृत्वा खाली काढण्यात आला होता.

वडगाव (को.) हे गाव वाळूज औद्योगिक वसाहतीमधील प्रसिद्ध असलेली ग्रामपंचायत आहे,वडगाव (को.).येथील ग्रामपंचायतीला कोट्यावधीचा निधी मिळतो, कारण आजूबाजूला शेकडो कारखाने आहेत या कारखान्यात काम करणारे हजारो कामगार या परिसरात वास्तव्यास आहेत. या राहिवाशांना ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारची योजना, निधी वगैरे देत नाही, मात्र कर घेण्यास चुकत नाही. या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकार्‍याने व भ्रष्ट सदस्यांनी याठिकाणी 14 व 15 व्या वित्त आयोगाकडून 2018 ते 2019 च्या दरम्यान आलेल्या 20 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे  उघड झाले चा आरोप रमेश भाऊ गायकवाड यांनी उपस्थित मोर्चे कऱ्यांना संबोधित करताना केला आहे. मराठवाडा बहुजन आघाडी संघटनेचे कार्यकर्ते रमेश बागुल व सतीश पवार यांनी  अपहार झाल्याची ऑनलाईन माहिती घेतली असता या गावात घोड्यांचा तबेला, खत निर्मिती कारखाना, स्मशानभूमी  रंगोटीकरण व सुशोभीकरण शिवीमिंग पूल, कॉम्पुटर इन्स्ट्यूट, कुस्ती आखाडा, ड्रेनेज लाईन,सिमेंट रस्ते, नवीन अंगणवाडी, सोलार सिस्टीम, वॉल कंपाऊंड,आदींची बोगस कागद पत्र तयार करून करोडो रुपये शासनाचे लुटले आहेत, अस्तित्वात मात्र एकही उपक्रम नाही. यामुळे संपूर्ण परिसर आणि नागरिक आवाक झाले आहेत.  संबंधित भ्रष्ट अधिकारी, व भष्ट सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल करावे व पिण्याचे पाणी वसाहती मध्ये  द्यावे या करिता  मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या वतीने आज दिनांक 3 जून 2022 सकाळी  12: 30 वाजता रोजी भव्य  हंडा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात रमेश गायकवाड यांनी सदर लोकांनी किती रक्कम हडप केली याचा पाढाच वाचला आहे. या मोर्चाचे पत्र ग्रामपंचायतचे प्रशासक दिपक बागुल,  ग्रामविकास अधिकारी हरीश आंधळे,यांना पत्र दिले. तर त्यांनी पंधरा दिवसात साईबन सोसायट सह गट नंबर आदी ठिकाणी पाणी पुरवठा करून सावित्रीबाई फुलेनगर व शिवाजीनगर येथील राहिवाशांना गायरान जमिनीचा मालकी हक्क देऊन त्याचे पि.आर.कार्ड देण्याचे आश्वासन पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी मगर यांनी पंधरा दिवसात देण्याचे उपस्थित मोर्चेकरी यांच्या समोर जाहीर केले. यावेळी जि.प.सदस्य रमेशदादा गायकवाड, प्रकाश निकम, रमेश बागुल, रमेश जायभाये, सचिन गंगावणे,महेश रगडे,सतीश पवार, सतीश काळे , मदन काळे , अभिषेक काळे , अक्षय काळे पांडूरंग साळे , सुनिल बोडखे , कचरू डेरे , शंकर बनकर ,भाऊसाहेब पवार, कृष्णा साळे पाटील, उधोजक संतोष लाठे, प्रवीणअप्पा नितनवरे, ॲड नामदेव सावंत, संजय निकम, अमोल निकम, राजू गोरगिले, सोमनाथ गवळी, यशपाल कदम, उमेश लाटकर,संजय लिहिणार,आणासाहेब वाघ, अशोक निकम, नाना कदम, विजय बागुल, मदन निकम, गौतम मोरे, आदी शेकडो नागरिक होते.
मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून वाळूज एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी संदीप गुरमे यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांचा चोख बंदोबस्त लावला होता.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा