वाहनधारकांनो सावधान पेट्रोल भरून घ्या नाहीतर पश्चाताप होईल

औरंगाबाद/ प्रतिनिधी - औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिक व वाहनधारकांना लवकरच पेट्रोल आणि डिझेल आपल्या वाहनात भरून घ्या नाहीतर पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाल्यावर पश्चाताप होईल. औरंगाबाद जिल्ह्यात 25 टक्के इंधन पुरवठा कमी झाल्याने भविष्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईचा सामना वाहनधारकांना करण्याची वेळ येणार असल्याची माहिती पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन्स औरंगाबाद चे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
      गेल्या वर्षभरात अनेक वेळा पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ करण्यात आली यानंतरही पेट्रोल आणि डिझेल इंधनाचा पुरवठा हा सुरळीत सुरू होता. मात्र गेल्या महिन्यापासून औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण पुरवठ्याच्या 25 टक्के इंधन गोठविण्यात आले आहे. सध्या आवश्यक असलेल्या इंधन पुरवठा मध्ये 25 टक्के कपात केल्याने अनेक पेट्रोल पंप कोरडेठाक पडत असल्याची माहिती अखिल अब्बास यांनी दिली. ओरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 280 पेट्रोल पंप आहेत तर औरंगाबाद शहरात 55 पेट्रोल पंप आहेत. यापैकी बहुतांशी पेट्रोल पंपावर गेल्या महिन्याभरात इंधन पुरवठा कमी होत असल्याने पंप चालकांना नाविलाजाने पेट्रोल पंप बंद करावे लागत आहे. पानेवाडी डेपो मधून पेट्रोल पंप यांना पुरवला जाणारा इंधन पुरवठा पेट्रोल आणि डिझेल या मध्ये कंपन्यांनी पंचवीस टक्के कपात सुरू केली आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेल चा तुटवडा निर्माण होत आहे. असेच सुरू राहिले तर भविष्यात इंधन पुरवठा हा 50 टक्के वाढणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते यावेळी अखिल अब्बास यांना असे विचारले की, इंधनाचा पुरवठा 25 टक्के कमी करण्यात आला तर त्यावर ते म्हणाले की, गेल्या दोन महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्याने कंपन्यांना जवळपास पंधरा ते वीस रुपये तोटा सहन करावा लागत आहे ही भाववाढ करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार परवानगी देत नाही. त्यामुळे कंपन्या टंचाई निर्माण करून पंधरा ते वीस रुपयांनी पेट्रोल दरवाढ करण्याची शक्यता आहे. येत्या महिन्याभरात पेट्रोलचा तुटवडा निर्माण करून कंपन्या पंधरा ते वीस रुपये पेट्रोलच्या दरात वाढ करणार असल्याचे अखिल अब्बास यांनी यावेळी माध्यमांना सांगितले. त्यामुळे वाहनधारकांना पेट्रोल आणि डिझेल आपल्या वाहनात भरून घ्या उद्या पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण होणार यात कुठलीही शंका नसल्याचे भाकीत संघटनेचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी सांगितले.  यावेळी पत्रकार परिषदेत हितेन पटेल, झिगझिस प्रिंटर्स आदींची उपस्थिती होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा