दोन लाख रुपये असलेली बॅग चोरट्यांनी पळवली

सिल्लोड/ प्रतिनिधी -  सिल्लोड तालुक्यातील भवन येथील बँक ऑफ बडोदा समोर एका भामट्याने काका तुमचे पैसे पडले असे म्हणून संबंधित व्यक्ती पैसे घेण्यासाठी खाली वाकल्या नंतर चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग पळवल्या ची घटना नुकताच घडली आहे,
सोपान गोरडे( वय 35 वर्षे, रा. बोरगाव कासारी, ता. सिल्लोड)  यांनी बँकेतून दोन लाख रुपये रोख रक्कम काढून एका बॅगमध्ये ठेवली. ते बँकेच्या बाहेर उभे असताना एका भामट्याने तुमचे पैसे खाली पडले अशी थाप मारली, त्याठिकाणी पाच पाचशे रुपयांच्या दोन नोटा खाली पडलेल्या होत्या. सदरील पैसे उचलले पर्यंत चोरट्याने दोन लाख रुपये ची बॅग घेऊन तिथून पोबारा केला.
दोन्ही चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते औरंगाबादच्या दिशेने सुसाट वेगाने निघून गेले. सदरील घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली असून, माहिती मिळताच  पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, पोलीस उपनिरीक्षक विकास आडे,  दादाराव पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा