गोवंशाचे मांस विक्री करीता घेऊन जाणाऱ्या ढोरकीन येथील दोन इसमावर MIDC पैठण पोलिसांची कारवाई*

Paithan-police-cow-mas

गोवंशाचे मांस विक्री करीता घेऊन जाणाऱ्या ढोरकीन येथील दोन इसमावर MIDC पैठण पोलिसांची कारवाई*

दिनांक 21/07/2024 रोजी API ईश्वर जगदाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत HF Deluxe मोटार सायकल नं. MH.20 FE.1472 हिच्यावर दोन इसम गो वंशाचे मांस विक्रीकरीता घेऊन जात आहे. सदर मोटरसायकल ही पिंपळवाडीच्या दिशेने येत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने Api जगदाळे यांनी तात्काळ पोलीस पथक पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले.

       पोलीस पथक पैठण हायवेवरील भीमाशंकर शाळेजवळ थांबले असता वरील वर्णनाची मोटार सायकलवर दोन इसम ढोरकीनकडून पिंपळवाडीच्या दिशेने येताना दिसली.पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला असता पोलिसाला पाहून गाडी जोरात पळवून उजवीकडे वळवून मदिनानगरमधे घुसवली.पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून त्यांनी गाडी गणेशनगरच्या दिशेने पळवली. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन दोन-तीन वेळा गाडी थांबवण्याचा इशारा केला परंतू त्यांनी गाडी थांबवली नाही. अखेर पोलिसांनी त्यांना गणेशनगर येथील एका किराणा दुकानाजवळ शिताफीने पकडले.तेव्हा त्यांनी त्यांची नावे 1) इब्राहिम रज्जाक शेख वय 55 वर्ष 2) इस्माईल शेख वय 19 वर्ष दो. रा. ढोरकिन ता.पैठण असल्याचे सांगितले. 

       त्यांना त्यांच्याजवळी पिशवीत काय आहे अशी विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यावेळी पिशवी चेक केली असता त्यात मांस मिळून आले. तेव्हा त्यांनी गोवंशाचे मांस असल्याची व ते ढोरकीन येथून घेऊन आल्याचे व जायकवाडी पिंपळवाडी येथे विक्रीकरीता घेऊन जात असल्याचे सांगितले.गोवंशाच्या कत्तल, गोमास वाहतूक व ताब्यात बाळगण्यास बंदी असताना देखील 30 किलो गोवंशाचे मांस ताब्यात बाळगताना मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले तसेच गोमांस वाहतूक करणारे वाहन देखील जप्त करण्यात आले असून सदर इसमाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

     *गोमांस कुठून खरेदी केले, जनावराची कत्तल कुठे झाली, कत्तल कोणी केली, गोमांस कोणाला विक्री करण्यासाठी जात होते याचा MIDC पोलीस सखोल तपास करणार असून या सर्व प्रक्रियेत जे लोक सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सपोनि ईश्वर जगदाळे यांनी दिली.*

सदरची कामगिरी :- पोलीस अधीक्षक श्री.मनीष कालवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनिल लांजेवर, उपविभागीय अधिकारी डॉ.सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, पोलीस उप निरीक्षक संभाजी झिंजूर्डे, पोलीस hi अंमलदार गणेश खंडागळे, राहुल मोहतमल, मिलिंद घाटेश्वर

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा