महापालिकेच्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध
औरंगाबाद / प्रतिनिधी - महानगरपालिका प्रशासनाने संत एकनाथ रंग मंदिर नाट्यगृहाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी दि़ 17 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली़ तसेच मनपाने निर्णय मागे न घेतल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा ईशाराही यावेळी देण्यात आला़
गेल्या चार वर्षापासूून संत एकनाथ रंगमंदिराच्या नुतनिकरणाचे काम सुरू होते़ त्यासाठी मनपाने 8.50 कोटी रूपये खर्च केले़ दोन वर्षात होणाऱ्या कार्याला चार वर्ष लागले तरीदेखील नागरिक व कलाकारांनी ते सहन केले़ आता रंगमंदिराच्या उद्घाटनाची प्रतीक्षा असतांना अचानक दि़23 जानेवारी रोजी मनपाने रंगमंदिराच्या खाजगीकरणाचा निर्णय घेतला जो सर्वानाचा धक्का देणारा आहे़ मुळात जर खाजगीरकरण करायचे होते तर 8.50 कोटी रूपये खर्च करण्याची आवश्यकताच काय होती? अगोदरच बीओटी तत्त्वावर स्वत: चे उत्पन्न ठरवून त्याच वेळेस ते कोणाला दिले असते तर चालले नसते का? आता खाजगीकरण करणे म्हणजे नागरिक व कलावंताची लूट करणे होय असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, महानगर अध्यक्ष बिपीन नाईक, जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर, शहर अध्यक्ष गजन गौडा पाटील,आशीष सुरडकर, विभाग अध्यक्ष अशोक पवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत दहिवाडकर, उपशहर अध्यक्ष राहुल पाटील,युवरा भवई,विकास रापटे, संकेत शेटे, अभय देशपांडे,अमित ठाकूर, जय वावरे,प्रशांत जोशी,प्रशांत अटोळे, प्रतिक गायकवाड आदींची उपस्थिती होती़.