भूमिहिन आदिवासींसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुदत १० जानेवारीपर्यंत
औरंगाबाद /प्रतीनिधी - भूमिहिन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील भूमिहिन आदिवासी कुटुंबांना 4 एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा 2 एकर (ओलीताखालील) जमीन देण्याबाबत प्रस्तावित आहे.
सदर योजना आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये 100 टक्के अनुदानित आहे. पात्र लाभार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद महानगरपालिका व्यापारी गाळे, तिसरा मजला, रिलायन्स मॉलजवळ, राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोर, गजानन मंदिर रोड परिसर, औरंगाबाद या कार्यालयातून फॉर्म घेऊन जावेत. परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह एकात्मिक आदिवासी विभक्त प्रकल्प कार्यालयाकडे 10 जानेवारी पर्यंत सादर करावेत. भूमिहिन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत आदिवासी विकास विभाग शासन निर्णयानुसार जमीन विक्रीसाठी इच्छुक बिगरआदिवासी जमीन मालकांनी प्रस्ताव 7/12 व नमुना 8 अ कागदपत्र जोडून परिपूर्ण प्रस्ताव विहित वेळेत सादर करावेत, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
दारिद्र्यरेषेखालील भूमिहिन आदिवासी परितक्त्या स्त्रिया, भूमिहिन कुमारी माता, भूमिहिन आदिम जमाती, भूमिहिन पारधी यांना प्राधान्य आहे. अर्जासोबत लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र, लाभार्थ्यांचे दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र (ग्रामसेवकाचे), लाभार्थ्याचे किमान वय 18 व कमाल 60 इतके असावे, लाभार्थी त्या गावचा रहिवासी असावा (ग्रामसेवक व सरपंच एकत्रित दाखला), दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये त्यांच्या नावाची नोंद असावी, शाळा सोडल्याचा दाखला, वयाचा दाखला, आधारकार्ड, उत्पान्नाचा दाखला, अर्जासोबत जोडावा असेही त्यांनी कळविले आहे.