हमारी युनियन हमारी ताकत जिल्हा परिषद कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन

औरंगाबाद /प्रतिनिधी  - पोषण ट्रॅकर या इंग्रजी ॲपवर कामे करण्याच्या सक्ती विरोधात  अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आज जिल्हा परिषद कार्यालया समोर जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी हमारी युनियन हमारी ताकत अशा घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता.
  महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने 9 ते 30 ऑगस्टपर्यंत राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून आज बुधवार दि. 10 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्हापरिषदेसमोर आयटकच्या वतीने सत्याग्रह करून जेलभरो आंदोलन करण्यात आले.   पोषण ट्रॅकरचे ॲप मराठीत उपलब्ध करून द्यावे,मराठीत ॲप उपलब्ध होईपर्यंत इंग्रजी ॲपवर कामे करण्याची सक्ती करू नये,उच्च न्यायालयाचा निकालाचा सन्मान करावा,इंग्रजी ॲपवर कामे केली नाहीत तर कामावरून कमी करण्याच्या धमक्या देणाऱ्या मुख्यसेविकावर कार्यवाही करण्यात यावी, ICDS योजनेचे सार्वत्रीकरण करावे व या योजनेतील सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दयावा, अंगणवाडी शिक्षिकेस तृतीय श्रेणी तर मदतनीसास चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, वेतनश्रेणी मिळेपर्यंत अंगणवाडी शिक्षिकेस रु.२५ हजार व मदतनीसास रु. १५ हजार किमान वेतन देण्यात यावे, मिनी अंगणवाड्याचे रुपांतर पूर्ण अंगणवाड्या मध्ये करण्यात यावे,मिनी अंगणवाड्यातील शिक्षिकेस पूर्ण अंगणवाडी प्रमाणे मानधन देण्यात यावे,अतिरिक्त कार्यभार सांभळणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या पदाचे निम्मे मानधन अतिरिक्त कामापोटी देण्यात यावें, सेवेक व मदतनीसाच्या सर्व रिक्त जागा त्वरित भराव्यात, निवृतीनंतर मिळणारे १ लाख व ७५ हजार रुपये अनेकांना देण्यात आलेले नाहीत ते त्वरित देण्यात यावेत,
एक रकमी रक्मेचे रुपांतर अंशदानात (ग्र्याचुईटी) मध्ये करावे व निवृतीनंतर दरमहा वेतनाच्या निम्मी रक्कम पेन्शन म्हणून देण्यात यावी,  प्रवास भत्ता चे थकीत पैसे ऍड करावेत.सर्व स्टेशनरी, रजिस्टर, साहित्य आदीचा पुरवठा नियमित करावा, सादीलचे पैसे वाढवून मिळावेत व त्यातून इतर खर्च करण्याची सक्ती करू नये<span;>  अशा विविध मागण्यांकरिता  आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये आयटक चे जिल्हाध्यक्ष डॉ.राम बाहेती, जिल्हा सचिव तारा बनसोडे, जिल्हा संघटक अनिल जावळे, संघटक विलास शेंगुळे, राज्य कॉन्सिल सदस्य शालिनी पगारे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य ज्योती गायकवाड, मीरा अडसरे, अनिता पावडे, माया भीवसने, मनीषा भोळे, अनुसया नेहरकर,  शन्नो शेख, विजया गठडी, अर्चना घाटे, उषा शेळके, प्रमिला सोनवणे, अनिता हिवराळे यांचा सहभाग होता.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा