बस चालकाने बस मध्येच घेतला गळफास

बस चालकाने बस मध्येच घेतला गळफास

संगमनेर /प्रतिनिधी -  अहमदनगर येथील संगमनेर बस डेपोमध्ये  चालकाने एसटीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकताच समोर आली आहे.
सुभाष तेलोरे  असं आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव असून ही घटना मंगळवार दि.21 सप्टेंबर रोजी पहाटे 6.30 च्या सुमारास घडली असावी अशी माहिती समोर येत आहे.

पाथर्डी - नाशिक  या बसचे ते चालक होते. संगमनेर बसस्थानकात डिझेल नसल्यानं नाशिकला न जाता संगमनेरला बस मुक्कामी होती. त्यावेळी पहाटेच्या सुमारास त्यांनी कपड्याच्या सहाय्याने बसमध्ये गळफास घेतला. एसटी चालक सुभाष तेलोरे हे कोल्हार तालुक्यातील पाथर्डी येथील निवासी असून ते एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा