बिबट्या पुन्हा दिसला शेतकऱ्यांमध्ये दहशत

बिबट्या पुन्हा दिसला शेतकऱ्यांमध्ये दहशत

वाळूज/ प्रतिनिधी -   मादी बिबट्या आपल्या दोन बछड्यांसह दि. 17 डिसेंबर रोजी वळदगाव शिवारात सांयकाळच्या वेळेस फिरताना आढळले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे या बिबट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांन कडून केली जात आहे.
वळदगावचे पोलिस पाटील प्रकाश म्हस्के व दीपक बर्डे हे दोघे शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास शेतातुन घरी जात होते. येथील गटनंबर ३६ मधुन जात असतांना कांचनवाडीतुन वळदगावकडे येणाऱ्या रस्त्यावर दोन बछड्यासह मादी बिबट्या या दोघांना दिसून आला. प्रसंगवधान राखत भितीने गाळण झालेले हे दोघे जागीच थबकल्याने मादी बिबट्या बछड्यासह शेतात निघुन गेली. मादी बिबट्या बछड्यासहदूर गेल्याची खात्री पटताच या दोघांनी शेतातुन धुम ठोकत गाव गाठत या घटनेची माहिती नातेवाईक व ग्रामस्थांना दिली. यानंतर उपसरपंच संजय झळके व पोलिस पाटील प्रकाश म्हस्के यांनी वनक्षेत्रपाल अण्णासाहेब पेहरकर यांच्याशी संपर्क साधुन बिबट्या मादी व पिल्ले दिसल्याची माहिती दिली.
मशिदीच्या लाऊडस्पिकर वरुन सर्तक राहण्याच्या सुचना दिल्या. वळदगावात अनेकांना बिबट्या दिसल्याने नागरिक व शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या भितीमुळे शेतातील कामे खोळंबली असून शेतमजुरही शेतात जाण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. गावातील दोघांना बिबट्या मादी व बछड्याने दर्शन दिल्याने  माजी सरपंच कांतराव नवले, उपसरपंच संजय झळके, पोलिस पाटील म्हस्के आदींनी मशिदीच्या लाऊड स्पिकरवरुन नागरिकांना विविध सुचना देऊन खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा