दुचाकी आणि बैलगाडीचा भीषण अपघात

दुचाकी आणि बैलगाडीचा भीषण अपघात

दुचाकी आणि बैलगाडीच्या भीषण अपघातात दोन व्यक्ती व एका बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
रत्नागिरी-सोलापूर महामार्गावरील सांगोला येथील हॉटेल श्रीराम प्युअर व्हेजसमोर दुचाकी आणि बैलगाडीच्या झालेल्या भीषण अपघातात एक बैल आणि दुचाकीवरील अभिजित भोसले आणि नंदकुमार चंद्रकांत चौधरी हे दोन जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास सांगोला येथे घडली. या अपघातात मृत झालेले दोन्ही व्यक्ती हे मोहोळ तालुक्यातील पापरी गावचे रहिवाशी आहेत.
धायटी (ता. सांगोला) येथील शेतकरी आपली बैलगाडी घेऊन रविवार, दि. २३ रोजी असणाऱ्या सांगोला येथील आठवडा बाजारात बैल विक्री करण्यासाठी चालले होते.
दरम्यान, त्यांची बैलगाडी रत्नागिरी-सोलापूर हा महामार्ग ओलांडून सांगोल्याच्या दिशेने जात असताना सोलापूरच्या दिशेने वेगाने चाललेली होंडा यूनिकॉर्न (क्र.एम एच १३ इ जी ५३६५) ही दुचाकी बैलगाडीवर आदळली.
हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये गाडीचा एक बैल आणि दुचाकीवर असणार आभाजिर भोसले (वय २८, रा.पापरी, ता. मोहोळ) व नंदकुमार चंद्रकांत चौधरी (वय २७, रा. पापरी) हे दोन्ही व्यक्ती जागीच ठार झाले.
तर बैलगाडी चालक देखील या अपघातात जखमी झाला असल्याची माहिती आता समोर येत आहे. अपघात झाल्याचे समजताच सांगोला पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले
आणि अपघातातील जखमी आणि मृत सर्वांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा